ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्री पदग्रहण सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवला.

तृणमूलने अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली.

भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची ५ मे रोजी शपथ घेणार आहेत.

कोणताही मोठा समारोह शपथविधी प्रसंगी होणार नाही, हा शपथविधी राज्यपाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे.

त्या सर्वांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी वेळ असणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts