मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. मात्र भाजपकडून नवाब मलिक यांचा राजीनामा (Resigned) घ्यावा यासाठी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) दबाव टाकण्यात येत आहे. यातच आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खबळजनक आरोप केला आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये भाजकडून नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा ही मागणी करण्यात येत आहे. त्यासाठ भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपकडून (BJP) आझाद मैदानात नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. त्याआधी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही तर दाऊदचा दबाव आहे. त्यामुळे ते नवाब मलिकचा राजीनामा घेत नाहीए.
दाऊदने फोन केला म्हणून ते त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, या सभागृहात राजीनाम्याची घोषणा केली पाहिजे. एक मंत्री कारागृहात आहेत. तरीही मंत्रीपदावर आहेत. हे काही योग्य नाही.
त्यामुळे मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी काढली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.