Mangal Gochar 2023 : ठराविक काळानंतर सर्व ग्रह आपले स्थान बदलत असतात. ज्याचा काही राशींवर चांगला परिणाम होतो तर काही राशींना त्याचा तोटा सहन करावा लागतो. मंगळ 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार असून तो त्याच स्थितीत 16 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. याचा फायदा काही राशींना होणार आहे. त्यांना नोकरी तसेच व्यवसायातून भरपूर पैसे मिळतील.
कर्क रास
कर्क रास असणाऱ्या लोकांसाठी तूळ राशीतील मंगळाचे भ्रमण खूप फायद्याचे मानले जाते. कारण या दरम्यान कर्क रास असणारे लोक इमारती, जमीन आणि वाहने खरेदी करण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान व्यवसायात आर्थिक गुंतवणुकीच्या अनेक शक्यता असतात, ज्या फायदेशीर ठरतील. या शिवाय या काळात कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. त्यामुळं त्यांचा पगार वाढू शकतो, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल.
वृश्चिक रास
तूळ राशीतील मंगळाचे संक्रमण वृश्चिक रास असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. खरे तर या काळात देशांतर्गत आणि परदेशातून आर्थिक लाभ होण्याच्या अनेक शक्यता असणार आहेत. इतकेच नाही तर आर्थिक समस्याही या काळात सुटू शकतात.
तसेच त्यांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे त्यांना जमिनीच्या कामातून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. परंतु त्यांना आरोग्याबाबत सावध राहावे लागणार आहे.
सिंह रास
सिंह रास असणाऱ्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण वरदानापेक्षा कमी नसेल. मंगळ संक्रमणाच्या संपूर्ण काळात या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीतून प्रचंड नफा होईल. या काळात सिंह राशीच्या लोकांची भाऊ, बहिण आणि नातेवाईकांमधील जवळीक वाढू शकते.
या काळात वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळण्यासोबतच कोणतीही मोठी योजना यशस्वी होऊ शकते. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ शुभ असून जे लोक सरकारी नोकरीत आहेत त्यांना बढतीचा लाभ मिळेल.