ताज्या बातम्या

Mansoon 2022: राज्यात ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट, तर ‘या’ ठिकाणी राहणार ढगाळ वातावरण; मान्सून कुठं लपलाय, वाचा सविस्तर

Mansoon Update: राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच सामान्य जनता गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील मान्सून आगमन (Mansoon Rain) काही काळ लांबलं असल्याचा धक्कादायक अहवाल भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नुकताच सार्वजनिक केला आहे.

सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) बघायला मिळत आहे तर काही भागात मान्सूनपूर्व पावसाची (Pre Mansoon Rain)हजेरी बघायला मिळत आहे.

याशिवाय राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) देखील बघायला मिळत असल्याने परस्पर विरोधी वातावरणामुळे नेमक मान्सून आगमन कधी होईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण बघायला मिळत आहे.

शिवाय भारतीय हवामान विभागाने (IMD) देखील मान्सून बाबत अजून कुठलीच स्पष्टोक्ती दिली नसल्याने मान्सून बाबत अजूनही स्पष्ट चित्र बघायला मिळत नाही.

आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. याशिवाय यादरम्यान विदर्भातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे पुढील पाच दिवस राज्यात परस्पर विरोधी वातावरण राहणार आहे.दरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी चार तारखेला म्हणजेच काल मान्सूनपूर्व पाऊस बघायला मिळाला.

यामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी अल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून हवामान थंड आहे. दरम्यान मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.

राजधानी मुंबई तसेच मुंबई उपनगरात काही ठिकाणी काल मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. मात्र विदर्भात तापमानात अजूनही वाढ आहे आणि येथील जनता मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मान्सून 29 मे रोजी केरळात दाखल झाला म्हणजेच या वर्षी मान्सून हा जवळपास तीन दिवस लवकर दाखल झाला.

यामुळे मान्सूनचे महाराष्ट्रात लवकर आगमन होणार असल्याचे भाकित वर्तवले जात होते. मात्र हवामान विभागाचा अंदाज आता फोल ठरला असून महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबले आहे.

केरळ मध्ये आल्यानंतर 31 मे रोजी मान्सूनने कर्नाटकात प्रगती केली अन आता कारवारपर्यंत दाखल झालेल्या मोसमी पावसाचा प्रवास सध्या मंद पडला असून मान्सून प्रवास संथ गतीने सुरू आहे.

सध्या मान्सून गोव्याच्या जवळ पोहोचला आहे, मात्र असे असले तरी पोषक वातावरण नसल्याने त्याची पुढे प्रगती थांबली आहे. अरबी समुद्रातील शाखेने गेल्या चार दिवसांपासून आगेकूच केली नाही हे महाराष्ट्रातील मान्सून लांबण्याचे प्रमुख कारण आहे.

बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाच्या शाखेने 3 जूनला मोठी प्रगती करीत पूर्वोत्तर राज्यांसह हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रगती केली. मात्र, शनिवारी काल याही भागातून मोसमी पावसाची प्रगती थांबली होती.

या समीकरणामुळे मुंबईमध्ये अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. निश्चितच मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला आणि उष्णतेने हैराण झालेल्या जनतेला मान्सूनची अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts