Mansoon 2022: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र मान्सून (Mansoon) विषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. अजून मान्सून देशात दाखल झालेला नाही तरीदेखील मान्सूनच्या चर्चा सर्वदूर बघायला मिळत आहेत.
भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorologocal Department) मान्सून 2022 बाबत आपला अंदाज सार्वजनिक केल्यापासून मान्सून आगमनाविषयी सर्वत्र चर्चासत्र बघायला मिळत आहे. खरं पाहता मान्सूनची सर्वात जास्त उत्सुकता शेतकरी बांधवांना (Farmer) असते.
मान्सूनचा यावर्षीचा अंदाज सार्वजनिक झाला असल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानकारक वातावरण बघायला मिळत आहे. आता या मान्सूनच्या एवढ्या चर्चा रंगत आहेत मग तो एवढा खास का? असा प्रश्न साहजिकच आपल्याही मनात घर करत असेल.
जर असे असेल तर मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कृषिप्रधान (Agriculture Country) भारत देशाचा कणा आहे शेती व्यवसाय (Farming) आणि भारतीय शेती ही सर्वस्वी आधारित आहे मान्सूनच्या पावसावर यामुळे मान्सूनचा फक्त अंदाज आला तरीदेखील बांधा पासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र मोठ्या हालचाली बघायला मिळतात. विशेष म्हणजे शेतकरी बांधव एक पेरणीचे नियोजन करतो तर शासन दरबारी येणाऱ्या हंगामासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी लगबग बघायला मिळते.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतात कोसळणारा 70% पाऊस हा मान्सून मध्ये येतो. यामुळे भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित शेती म्हणून ओळखली जाते. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या आपला उदरनिर्वाह केवळ आणि केवळ शेतीवर भागवत असते.
एवढेच नाही तर देशाच्या जीडीपी चा 17 टक्के वाटा हा आपल्या काळ्या आईचा. यामुळे मान्सूनचा अंदाज हा समाधानकारक आला तर देशातील एक मोठा भाग प्रफुल्लीत होत असतो. मान्सूनच्या अंदाज केवळ शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी महत्त्वाचा आहे असे नाही तर यामुळे इतर उद्योगधंदे देखील अप्रत्यक्षरीत्या प्रभावित होत असतात.
मान्सून केव्हा होणार दाखल
भारतासाठी मान्सूनची उपयोगिता बघता सर्वत्र मान्सूनची मोठ्या आतुरतेने वाट बघितली जात आहे. यादरम्यान, स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने नुकतेच काल-परवा मान्सून विषयी भविष्यवाणी केली आहे.
स्कायमेट अनुसार, या वर्षी मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार आहे. म्हणजे यावर्षी मान्सून एक जूनलाच अगदी मुहूर्ताला दाखल होणार. याशिवाय या वर्षी मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार आहे.
यावर्षी जर मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तर सलग चौथ्यांदा असं घडणार आहे आणि यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हीच बाब भारतीय शेतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
सामान्य मान्सून कसा असतो?
मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून या वर्षी मान्सून सामान्य राहणार असा अंदाज वर्तवला जात आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सामान्य मान्सून म्हणजे नेमके काय? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मान्सून कालावधीत जर पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 96 ते 104 टक्के बरसला तर अशा पावसाला सामान्य मान्सून म्हणून ओळखलं जातं.
मित्रांनो 1961 ते 2010 या कालावधीत पावसाची सरासरी 88 सेंटीमीटर एवढी आहे. यंदाच्या मान्सून मध्ये स्कायमेटने सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक म्हणजेच 88 सेमी ते त्याहून अधिक असा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे तूर्तास तरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे.
मान्सून हा भारतीय शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मान्सूनवर शेतकरी बांधवांचे उत्पन्न अवलंबून असते, शिवाय मान्सूनच्या पावसावरच आपल्या देशाचा अर्थकारणाचा गाडा हाकला जातो.
यामुळे सुरुवातीला पावसाचे दणक्यात आगमन आणि नंतर उघडीप दिली तर शेतकरी बांधवांसमवेतच इतर उद्योग धंद्यांवर देखील विपरीत परिणाम बघायला मिळतो. यामुळे मान्सून हा भारतीय शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा असून मान्सून काळात सामान्य पेक्षा अधिक पाऊस होणे गरजेचे असते.