ताज्या बातम्या

धक्कादायक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात माओवादी शिरले होते…

 India News:केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन झाले. या आंदोलनात देशविघातक प्रवृत्ती सहभागी झाल्याचा आरोप भाजप आणि केंद्र सकारकडून करण्यात येत होता.

त्याला पुष्टी देणारी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. महाराष्ट्रातून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भातून मोओवादी गेले होते, अशी माहिती त्यांच्याच संघटनेच्या कागदपत्रांतून पुढे आली आहे.

सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यानिमित् नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने २२ पानी पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यामध्ये हा उल्लेख आहे.

यामध्ये त्यांनी केलेल्या आंदोलनांची माहिती देण्यात आलेली आहे. तेथे दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर झालेल्या शेतकरी आंदोलनात नक्षलवाद्यांनी सहभाग घेतल्याचा उल्लेख आहे.

नक्षलवाद्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले असल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. अग्निवीर योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही सहभाग नोंदवला असल्याचे माओवाद्यांच्या दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.

लोकांच्या आंदोलनात रणनीती आखून सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहनही माओवाद्यांनी केले आहे. शहरी भागात गनिमी काव्याने जनआंदोलन उभारण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी आपल्या दस्तऐवजात केले आहे. बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंडमधील अनेक शहरी भागांतही नक्षलवाद्यांकडून प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts