Maruti EV : मारुती लाँच करू शकते ‘या’ कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Maruti EV : संपूर्ण देशभरात इलेक्ट्रिक कार्सची (Electric cars) मागणी वाढली आहे. अशातच कंपन्याही बाजारात सतत नवनवीन मॉडेल सादर करत असते.

लवकरच मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या कारचे नवीन मॉडेल लाँच (Maruti Electric car) करू शकते. अलीकडेच याबाबत कंपनीने (Maruti) संकेत दिले आहेत.

ती कोणती कार असेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपली हॅचबॅक वॅगन आर (Wagon R) इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर करू शकते. असे झाल्यास मारुतीची ही पहिली इलेक्ट्रिक कार असेल.

केव्हा होईल लाँच

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी येत्या दोन वर्षात भारतीय बाजारात (Indian market) लॉन्च करू शकते. सध्या कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

क्षमता काय असेल

माहितीनुसार, कंपनी यामध्ये अनेक फीचर्ससह चांगली बॅटरी देऊ शकते. यामध्ये वापरण्यात आलेली बॅटरी एका चार्जमध्ये 200 ते 250 किमीची रेंज देऊ शकते.

कंपनीने ईव्हीची झलक दाखवली

त्याची इलेक्ट्रिक कार कंपनीने 2020 ऑटो एक्स्पो दरम्यान शोकेस केली होती. दोन वर्षांपूर्वी, कंपनीने Futuro-e च्या रूपाने आपल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली होती. तेव्हापासून लोक कंपनीच्या इलेक्ट्रिक कारच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

किंमत किती असेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपली इलेक्ट्रिक कार 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत सादर करू शकते. या किमतीत ही इलेक्ट्रिक कार टाटाच्या Tiago EV (Tata Tiago EV) ला आव्हान देऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts