Auto Expo 2023 : मारुती सुझुकी ही देशातील आघाडीच्या कंपन्यांमधील एक कंपनी आहे. या कंपनीचा मार्केटमध्ये चांगला दबदबा आहे. नुकत्याच सुरु असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.
मारुती इलेक्ट्रिक SUV eVX ही कंपनीची आगामी कार आहे. विशेष म्हणजे ती एका चार्जवर 550KM ची रेंज देते. तसेच कंपनी जबरदस्त फीचर्सही यामध्ये देत आहे.
असे आहे डिझाइन
‘भावनिकदृष्ट्या अष्टपैलू क्रूझर’ पासून प्रेरित – संकल्पना EVX ही कंपनीची मध्यम आकाराची इलेक्ट्रिक SUV आहे. ही संकल्पना सुझुकी मोटर कॉर्पोरेशन जपानने डिझाइन आणि विकसित केली असून वाहनाची लांबी 4300 मिमी, रुंदी 1800 मिमी आणि उंची 1600 मिमी इतकी आहे. यामध्ये उच्च ग्राउंड क्लीयरन्स, बाह्य शरीरावर खडबडीत क्लेडिंग आणि बरेच काही आहे.
या दिवशी येणार
कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV eVX च्या जागतिक प्रीमियरवर भाष्य करताना, तोशिहिरो सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी संचालक आणि अध्यक्ष म्हणाले की, “आज माझ्याकडे एक रोमांचक घोषणा आहे. आमची पहिली जागतिक धोरणात्मक EV, संकल्पना EVX चे अनावरण करताना मला आनंद होत असून ती बाजारात 2025 पर्यंत येईल.
ग्लोबल वार्मिंगला संबोधित करण्यास प्राधान्य आहे. तसेच आमच्या व्यवसायातून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही अनेक जागतिक उपायांना प्रोत्साहन देत असून यापैकी एक प्रमुख उपाय म्हणजे आमची उत्पादने वापरून उत्सर्जित CO2 कमी करणे. गेल्या वर्षी मार्चमध्ये जाहीर केल्यानुसार, आम्ही BEV आणि त्यांच्या बॅटरीच्या उत्पादनात 100 अब्ज रुपयांची गुंतवणूक करू.”
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले, “4 दशकांहून अधिक काळ, मारुती भारतात गतिशीलतेचा आनंद पसरवत आहे त्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण होत आहेत.
हे सुझुकीचे पहिले जागतिक धोरणात्मक इलेक्ट्रिक वाहन असून आता ते भारतात पदार्पण करत आहे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे. याची आकर्षक डिझाइन आहे.
मारुती सुझुकीने एक्स्पोमध्ये वॅगनआर फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप, ब्रेझा एस-सीएनजी आणि ग्रँड विटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड यासारख्या “शाश्वत” कारची श्रेणी देखील प्रदर्शित केली आहे.