ताज्या बातम्या

Maruti Suzuki Alto 800 : मारुती सुजुकीने बंद केले या लोकप्रिय कारचे उत्पादन, रिपोर्टमध्ये समोर आली धक्कादायक माहिती

Maruti Suzuki Alto 800 : भारतीय बाजारात मारुती सुझुकीच्या सर्व कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही सतत नवनवीन कार लाँच करत असते. कंपनीच्या सर्व कारमध्ये जबरदस्त मायलेज उपलब्ध असते. अशातच काही दिवसांपूर्वी कंपनीने अल्टो 800 लाँच केली होती.

कंपनीची ही सर्वात लोकप्रिय कार आहे. मार्केटमध्ये तिला सर्वात जास्त मागणी आहे. मात्र आता कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने या कारचे उत्पादन थांबवले असल्याचे एका अहवालात उघड झाले आहे.

जाणून घ्या यामागचं कारण

एंट्री-लेव्हल हॅचबॅक बाजारात कमी विक्री व्हॉल्यूममुळे, 1 एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या BS6 स्टेज 2 नियमांची पूर्तता करण्यासाठी Alto 800 मध्ये बदल करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. FY16 मध्ये, एंट्री-लेव्हल हॅचबॅक क्लासचा बाजारातील हिस्सा सुमारे 15 टक्के इतका होता तसेच 4,50,000 पेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली होती. FY23 मध्ये अंदाजे 2,50,000 युनिट्सच्या विक्रीसह, मार्जिन 7 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे.

झाली इतकी युनिटची विक्री

भारतात मारुती सुझुकी अल्टो 800 2000 साली लॉन्च झाली. 2010 पर्यंत, मारुतीच्या 1,800,000 कारची विक्री झाली होती. यानंतर 2010 मध्ये Alto K10 लाँच केली आहे. 2010 पासून आजपर्यंत, या ऑटोमेकरने 17 लाख अल्टो 800 आणि 9 लाख 50 हजार अल्टो के10 ची विक्री करण्यात आली आहे. अल्टो लेबल अंतर्गत दरवर्षी सुमारे 4,450,000 युनिट्सचे उत्पादन घेतले जात आहे.

एंट्री लेव्हल मॉडेल

बाजारात मारुती अल्टो 800 ची किंमत रु. 3,54,000 ते रु 5,13,000 (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) दरम्यान आहे. मात्र आता ती बंद केली आहे, 3.99 लाख ते 5.94 लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) ची किंमत असणारी Alto K10 ही कंपनीची एंट्री-लेव्हल कार झाली आहे. एका अहवालानुसार, उर्वरित स्टॉकची विक्री होईपर्यंत मारुती अल्टो 800 उपलब्ध असणार आहे.

किती असणार इंजिन आणि पॉवर

या कारमध्ये 796cc पेट्रोल इंजिन दिले आहे जे जास्तीत जास्त 48 PS पॉवर आणि 69 Nm पीक टॉर्क निर्माण करत आहे. हे सीएनजी पर्यायासह उपलब्ध आहे. या CNG मोडमध्ये, इंजिनची पॉवर 41PS आणि टॉर्क 60Nm पर्यंत घसरते. तर हे इंजिन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts