Maruti Suzuki Alto K10 : देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी मारुती अल्टो K10 एक आहे. नुकतेच अल्टोचे न्यू जनरेशन मॉडेल (Alto New Generation Model) भारतीय बाजारात (Indian market) लाँच झाले आहे.
या कारचे जुने मॉडेलदेखील (Old model) खूप लोकप्रिय झाले होते. ही कार भारतातल्या बेस्ट सेलिंग कार्सपैकी एक कार आहे.
सर्वसामान्यांमध्ये या गाड्यांची क्रेझ (Alto Craze) आहे. ही क्रेझ कायम ठेवण्यासाठी कंपनी वेळोवेळी आपले मॉडेल्स (Maruti Suzuki Alto K10 Launch) अपडेट करून बाजारात सादर करत असते. या क्रमाने कंपनीने आपला Alto K10 बाजारात आणली आहे.
या 2022 Alto K10 मध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत, मारुती सुझुकीच्या नवीन Alto K10 मॉडेलबद्दल बोलूया-
नवीन मारुती अल्टो K10: किंमत
कोणतेही वाहन खरेदी करण्यापूर्वी आपण प्रथम त्याची किंमत जाणून घेतो की ते आपल्या बजेटमध्ये आहे की नाही. मारुतीने नवीन Alto K10 च्या बेस मॉडेलची (STD व्हेरिएंट) किंमत 3.99 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) आहे.
तिच्या टॉप व्हेरिएंट VXI+ ची किंमत 5,83,500 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) आहे.) मारुती अल्टो K10 च्या या नवीन अवतारमध्ये कंपनीने 998 cc इंजिन दिले आहे. नवीन Alto K10 चे मायलेज 24.39 kmpl आहे.
नवीन मारुती अल्टो K10: आकारमान
या नवीन मारुती अल्टोच्या आकारमानाबद्दल बोलायचे झाल्यास, तिची लांबी 3530 मिमी, रुंदी 1490 मिमी आणि उंची 1520 मिमी आहे. त्याच्या व्हीलबेसबद्दल बोलायचे झाले तर ते 2,380 मिमी आहे.
मारुतीच्या या नवीन मॉडेलच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर, एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
अल्टोचे हे मॉडेल 4 ट्रिममध्ये ऑफर केले आहे – STD, LXI, VXI, VXI+ मारुतीच्या Alto K10 च्या कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार Sizzling Red, Earth Gold, Speedy Blue, Solid White, Silky White आणि Granite Grey रंगामध्ये येते.
नवीन मारुती अल्टो K10: इंजिन
नवीन मारुती अल्टो K10 मध्ये ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 1.0-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिनद्वारे समर्थित आहे आणि 5,500 rpm वर 66 bhp पॉवर आणि 3,500 rpm वर 89 Nm टॉर्क देऊ शकते, 5-स्पीड-मॅन्युअल आणि AGS (Automatic gear shift) ट्रान्समिशनमध्ये जोडली जाते.
मारुती अल्टो K10 हा HEARTECT प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे आणि तोच प्लॅटफॉर्म आहे ज्यावर Celerio, S-Presso आणि WagonR देखील तयार करण्यात आला आहे.