Maruti Suzuki Alto : भारतीय बाजारात अनेक कार लाँच होत असतात. भारतीय ग्राहक सध्या देशातील इंधनाचे दर वाढल्यामुळे जास्त मायलेज देणाऱ्या कार खरेदी करत असतात. मारुती सुझुकीची अल्टो ही कार सर्वोत्तम कार मानली जाते.
लाँच झाल्यापासून या कंपनीने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. अनेकजण ही कार खरेदी करत आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे तिचे उत्तम मायलेज आणि तिची किंमत. खूप स्वस्तात तुम्ही कंपनीची ही लोकप्रिय कार खरेदी करू शकता. जाणून घेऊयात या कारचे फीचर्स…
कसे आहे डिझाइन
कंपनीची मारुती सुझुकी अल्टो सध्या चार प्रकारात उपलब्ध आहे. यात STD, LXI, VXI आणि VXI Plus यांचा समावेश आहे. जर या कारच्या डिझाईनबद्दल सांगायचे झाल्यास या कारमध्ये नवीन फ्रंट आणि रियर बंपर दिले आहेत. तसेच यात नवीन सिंगल-पीस ग्रिल, ब्लॅकन केलेले स्टील रिम्स, इंटिग्रेटेड स्पॉयलर आणि फेंडर-माउंट केलेले टर्न इंडिकेटर मिळत आहेत.
जाणून घ्या मारुती सुझुकी अल्टोची शानदार वैशिष्ट्ये
कंपनीकडून या कारमध्ये सर्वात उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात तुमच्यासाठी 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, सर्कुलर एसी व्हेंट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, फ्रंट पॉवर विंडो आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यांसारखी जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच EBD सह 2 एअरबॅग आणि ABS मिळत आहे.
किती आहे किंमत
कंपनीने या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 3.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 6.64 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये सुमारे 25 ते 28 किमी प्रति लीटर मायलेजही पाहायला मिळेल.