Maruti Suzuki Ciaz : जर तुम्ही मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय सियाझच्या डेल्टा प्रकारातील कारच्या किमतीत वाढ केली आहे.
त्यामुळे जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला आता जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. नवीन वर्षात कार कंपन्यांनी कारच्या किमतीत कमालीची वाढ केली असल्याने ग्राहकांच्या आता खिशावर आर्थिक ताण निर्माण होत आहे. जाणून घ्या कारची नवीन किंमत
किमतीत वाढ
मारुती सुझुकी या कंपनीने आपल्या सियाझच्या डेल्टा प्रकारात वाढ केली आहे. त्यामुळे तुम्हाला आता हा व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी 6500 हजार रुपये जास्त जास्त द्यावे लागणार आहेत. तर, सर्वाधिक वाढ Zeta आणि Zeta स्वयंचलित प्रकारांमध्ये झाली असून ग्राहकांना आता या व्हेरियंटसाठी 11,000 रुपयांनी वाढ केली आहे.
कसे आहे इंजिन?
कंपनीकडून ग्राहकांसाठी आपल्या कारमध्ये अतिशय मजबूत इंजिनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात K15B 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले असून जे RDE आणि BS6 फेज 2 नियमांनुसार अपग्रेड केले आहे. तसेच याला 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनने जोडले आहे.
जाणून घ्या मारुती सुझुकी सियाझची शानदार वैशिष्ट्ये
कंपनीकडून या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्सही देण्यात आली आहेत. यामध्ये, तुम्हाला ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकरिंग पॉइंट्स, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, 7 इंच इंफोटेनमेंट युनिट यांसारखी जबरदस्त वैशिष्ट्ये पाहायला मिळणार आहेत.
किती आहे किंमत?
कंपनीच्या या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 9.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर या कारचे टॉप मॉडेल तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 12.29 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.