Maruti Suzuki : एप्रिल महिन्यापासून सर्व कंपन्यांनी कारच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. अशातच जर तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण आता तुम्ही खूप स्वस्तात Maruti Suzuki च्या कार खरेदी करू शकता. तुमचे 60,000 रुपये वाचू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी संधी फक्त काही दिवसांसाठीच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर Maruti Suzuki च्या कार खरेदी करा.
Alto K10 वर किती मिळत आहे सूट?
सर्वात मोठी सूट मिळवणाऱ्या Alto K10 च्या या कारवर 40,000 ग्राहक ऑफर उपलब्ध असणार आहे. यात 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. तुमची यावर एकूण 59,000 रुपयांची बचत होणार आहे.
स्विफ्ट आणि एस-प्रेसोवर किती मिळत आहे सूट?
Alto K10 नंतर स्विफ्ट आणि S-Presso वर 49,000 रुपयांची बचत होणार आहे. डिस्काउंट ब्रेकअपमध्ये 30,000 रुपयांना ग्राहक ऑफर 15,000 रुपयांना एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांना कॉर्पोरेट सूट याचा समावेश आहे.
WagonR आणि Celerio वर होणार हजारो रुपयांची सूट
या ऑफर्स शिवाय, WagonR आणि Celerio खरेदी करणारे ग्राहक 44,000 रुपयांपर्यंतचे फायदे घेऊ शकतात. देशातील सर्वात मोठी कार निर्माता त्यांच्या काही नवीन आणि सर्वोत्तम विक्री मॉडेल्सवर खूप मोठी सवलत देत आहे.