Maruti Swift : मारुती सुझुकी दरवर्षी लाखो कार लाँच करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी स्विफ्ट ही कार आणली होती. कंपनीची प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील सर्वात जास्त विक्री करणारी कार आहे. शानदार मायलेज आणि स्पोर्टी लुकमुळे या करणे ग्राहकांच्या मनावर चांगलेच राज्य निर्माण केले आहे.
8.85 लाखांपर्यंत या कारची किंमत जाते. परंतु तुम्ही आता खूप कमी किमतीत ही कार खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही वेबसाइटवर जावे लागणार आहे. या ठिकाणी कारवर सगळ्यात मोठी ऑफर मिळत आहे.
किमतीबद्दल बोलायचे झाले तर मारुती स्विफ्टची देशातील किंमत रु. 5.92 लाख पासून सुरू होते तर टॉप-एंड प्रकारासाठी रु. 8.85 लाखांपर्यंत जाते. परंतु तुम्ही आता कमी किमतीतही ही कार खरेदी करू शकता. सध्या बऱ्याच ऑनलाइन युज्ड व्हेईकल ट्रेडिंग वेबसाइट्स या कारच्या जुन्या मॉडेलवर आकर्षक ऑफर देत आहेत.
1. OLX वेबसाइट
तुम्ही आता मारुती स्विफ्टचे जुने मॉडेल OLX वेबसाइटवर खूप स्वस्तात खरेदी करू शकता. ही 2009 मॉडेलची कार असून तिची नोंदणी दिल्ली येथील आहे. ही कार उत्तम स्थितीत आहे. या ठिकाणाहून तुम्ही ही कार 95 हजार रुपयांना सहज खरेदी करू शकता.
2. DROOM वेबसाइट
तसेच तुम्ही DROOM वेबसाइटवर ही कार खरेदी करू शकता. ही 2010 मॉडेलची कार असून तिची नोंदणी दिल्ली येथील आहे. ही कार उत्तम स्थितीत ठेवली आहे. ही कार तुम्ही या वेबसाइटवरून फक्त 1.30 लाख रुपयांना सहज खरेदी करू शकता.
3. CARTRADE वेबसाइट
या वेबसाइटवर तुम्ही स्विफ्टचे जुने मॉडेल कमी किमतीत खरेदी करू शकते. ही 2011 मॉडेलची कार असून तिची नोंदणी दिल्ली येथील आहे. ही कार उत्तम स्थितीत असून जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला यासाठी 1.50 लाख रुपये मोजावे लागणार आहे.