Maruti Suzuki Jimny :मारुतीची ‘ही’ शानदार एसयूव्ही 2 लाख रुपयांनी झाली स्वस्त, जाणून घ्या ऑफर

Maruti Suzuki Jimny : मारुती सुझुकीची वाहने सध्या ऑटो सेक्टरमध्ये धुमाकूळ घालत आहेत. सध्या सर्वाधिक कार विक्री जर आपण पाहिली तर ती मारुतीची आहे.

मागील दोन महिन्याचा डेटा पाहता कार विक्रीमध्ये मारुती अव्वल राहिली आहे. कार मधील फिचर, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील किमती आदी गोष्टी याला कारणीभूत आहेत.

जानेवारी मध्ये कंपनी आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. दरम्यान या अगोदरच कंपनीने आपल्या एका शानदार एसयूव्ही वर मोठी ऑफर दिली आहे. या एसयूव्हीची किंमत दोन लाख रुपये कमी केली आहे. ही एसयूव्ही आहे Maruti Suzuki Jimny. कंपनीने ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत ठेवली आहे.

* Jimny Thunder Edition

Jimny Thunder Edition ही पूर्णपणे ब्लॅक थीममध्ये येते. कारच्या दोन्ही बाजूला माउंटन ग्राफिक्स देण्यात आले आहेत. याआधी दिवाळीमध्य कंपनीने या एसयूव्हीवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट दिली होती. या कारमध्ये 4 व्हील ड्राइव्ह आहे. यात 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

* फीचर्स, मायलेज

एसयूव्हीच्या पुढील बंपरवर, बाहेरील रियर व्ह्यू मिरर्स, बोनेट आणि साइड फेंडरवर विशेष गार्निश दिसत आहे. यात साइड डोअर क्लेडिंग, फ्रंट स्किड प्लेट, डोअर सिल गार्ड आणि विशेष ग्राफिक्स आहेत. यात 1.5 लीटर 4 सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 105 bhp ची कमाल पॉवर आणि 134 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. ही ऑफ-रोड एसयूव्ही 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शनसह येते. याचे मायलेज 16.94 किलोमीटर प्रति लिटर असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

* किती असणार किंमत

कंपनीने दिलेल्या डिस्काउंटनंतर ही Jimny Zeta MT आता 10.74 लाख रुपयांना विकली जाईल. एक्स-शोरूममध्ये उपलब्ध होईल. तर, अल्फा 12.74 लाख रुपयांना उपलब्ध असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या जिमनी मध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन ऑप्शन आहे. ही SUV 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. कारमध्ये वायरलेस चार्जर, सहा एअरबॅग्ज अशी सेफ्टी फीचर्स देखील कंपनीने दिली आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts