अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलकांची
खा. सुजय विखे व माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली. मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असून ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलन सुरू होते. सुमारे 1 तास खा.विखे व माजीमंत्री कर्डीले यांनी आंदोलकांशी चर्चा केली मात्र सकारात्मक चर्चा न झाल्याने सायंकाळी पुन्हा कारखाना व्यवस्थापण व आंदोलक यांच्यात चर्चा होऊन मार्ग काढला जाणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, माजी चेअरमन उदयसिंह पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
कामगारांनी आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे – खा. विखे
आमच्या काळातील देणी देण्यासाठी आम्ही बाधिल आहोत पाच वर्षात अडीच वर्षं कारखाना अनंत अडचणी सामोरे जात संचालक मंडळ सामोरे गेले. मागील १२ कोटी रुपयाचे उसाचे थकीत देणं दिली.
जिल्हा बॅंकेचे देणे काही प्रमाणात मिटवले आता देखील कारखान्याच्या मालकीच्या जमिनी विक्रीसाठी परवानगी मागितली आहे. आमच्या वर विश्वास ठेवा.कामगारांनी आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे.असे खा. विखे म्हणाले.
उपाशी मरण्यापेक्षा आंदोलन करुन मरणं आलेले चालेल !
“आता आमच्या मागण्या पुर्ण झाल्या शिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. २५ कोटी ३६लाख रुपये कामगारांना घेणे असून आज आजारी पडलो तरी औषधे घेण्यासाठी देखील पैसे नाहीत तसे उपाशी मरण्यापेक्षा आंदोलन करुन मरणं आलेले चालेल. असे आंदोलनकर्ते इंद्रभान पेरणे यांनी सांगितले.