ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; रासायनिक खत तुटवडा, खत सबसिडी बाबत आज काय निर्णय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Central Government : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत रासायनिक खतांवर सबसिडी वाढ देण्याची शक्यता आहे.

असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पामध्ये फर्टीलायझर च्या विविध प्रकारावर दिल्या जाणाऱ्या सबसीडी मध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती.

मात्र गेल्या महिन्यापासून रशिया-युक्रेन देशातील युद्धजन्य परिस्थिती मुळे खाते तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होत नसल्यामुळे कच्च्यामालात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

याचा सर्वाधिक फटका भारतातील फर्टिलायझर कंपन्यांना बसत आहे. रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्चामालाची आयात न झाल्यामुळे देशात रासायनिक खताची कमतरता सुद्धा जाणवू शकते.

त्यामुळे केंद्र सरकार रासायनिक खतावर सबसिडी देण्यात बाबत आज बैठक दरम्यान निर्णय घेऊ शकते. रासायनिक खतावरील सबसिडीचा फायदा शेतकऱ्यांसह उत्पादक कंपन्यांना देखील होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts