बऱ्याच नागरिकांचे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. परंतु ही इच्छा प्रत्येकालाच पूर्ण करता येणे शक्य नसते. कारण या शहरांमध्ये जागा आणि घरांच्या किमती गगनाला पोहोचलेल्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक(Financial) दृष्ट्या हे परवडण्यासारखे नाही. परंतु अशा नागरिकांसाठी म्हाडा(Mhada) आणि सिडकोच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरामध्ये घरांची उपलब्धता करून देण्यात येते.
याचा अनुषंगाने म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून तब्बल 4 हजार 82 घरांच्या सोडती करिता अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. या लेखामध्ये म्हाडाच्या मुंबई (Mumbai) मंडळाच्या या घरांच्या सोडतीसंबंधीची अर्जाची शेवटची तारीख, प्राप्त झालेल्या अर्ज व पुढील प्रक्रिया इत्यादी विषयी माहिती घेणार आहोत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून घरांच्या सोडतीकरिता एक लाखांपेक्षा जास्त अर्ज दाखल
यासंबंधीचे सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून तब्बल 4082 घरांच्या सोडती करिता 22 मे पासून अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रिया(Processing) सुरू करण्यात आलेली होती. आतापर्यंत या सोडतीकरिता उत्तम प्रतिसाद मिळालेला दिसून आला आहे.
जर आपण शनिवारचा विचार केला तर काल सायंकाळपर्यंत एक लाख वीस हजार 174 अर्जांची नोंदणी या सोडती करिता करण्यात आलेली आहे. यापैकी 77 हजार 911 अर्जदारांनी म्हाडाच्या अपडेटेड असलेल्या प्रणालीमध्ये या सोडती करिता आवश्यक असलेली अनामत रक्कम देखील भरलेली आहे.या सोडतीकरता ऑनलाइन अर्ज(Online Application)नोंदणीची शेवटची तारीख 10 जुलै आहे.
कोणत्या ठिकाणी आहेत ह्या सदनिका उपलब्ध?
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, विक्रोळी, बोरिवली, पवई, ताडदेव, सायन, घाटकोपर इत्यादी ठिकाणी 4082 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असून त्याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 22 मे रोजी करण्यात आला होता.
अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे ही खास प्रणाली
आयएचएलएमएस 2.0 एकात्मिक गृहनिर्माण व्यवस्थापन प्रणाली ही म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रणालीचे 2.0 वर्जन आहे. हे वर्जन अर्जदारांसाठी अँड्रॉइड मोबाईल आणि अँपल मोबाइल वर देखील उपलब्ध करून देण्यात आले असून जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर हे व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे तर एप्पल मोबाइल फोनवर अँप स्टोअरमध्ये हे सोडत प्रणालीचे मोबाईल एप्लीकेशन म्हाडा हाउसिंग लॉटरी सिस्टम मध्ये अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या एकात्मिक संगणकीय सोडत प्रणालीचा वापर या सोडतीकरिता करण्यात येत असून सध्या या सोडतीसाठी ई नोंदणी सुरू आहे. उद्या म्हणजेच 10 जुलै अर्ज नोंदणीचे शेवटची तारीख असून त्यानंतर सोडतीची निश्चित तारीख लवकरच म्हाडा कडून जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या कोणी इच्छुकांना अर्ज नोंदणी करायचे असेल त्यांनी लवकर करून घेणे गरजेचे आहे.