ताज्या बातम्या

Mi TV 5X : 24,999 रुपये नव्हे तर अवघ्या 9,499 रुपयांना खरेदी करता येतोय Xiaomi चा शानदार टीव्ही, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Mi TV 5X : सध्या स्मार्ट टीव्हीची क्रेझ तयार झाली आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक स्मार्ट टीव्ही खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक स्मार्ट टीव्ही निर्मात्या कंपन्या मार्केटमध्ये नवनवीन स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत.

अशातच जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता Mi TV 5X हा स्मार्ट टीव्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीची किंमत 24,999 रुपये इतकी असून तुम्ही तो अवघ्या 9,499 रुपयांना खरेदी करू शकता.

कंपनीचा आगामी स्मार्ट टीव्ही 20W स्पीकरसह येतो, जो डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करेल. तसेच तो ऑडिओ सिस्टम DTS Virtuous सह येतो. कंपनीने यात ड्युअल बँड आणि ऑटो लो लेटन्सी मोड, वायफाय, ब्लूटूथ 5.0 यांसारखी अनेक शानदार वैशिष्ट्ये दिली आहेत. याशिवाय यात कंपनीकडून कनेक्टिव्हिटी म्हणून HDMI, 3.5mm जॅक, USB, AV, इथरनेट आणि अँटेना पोर्ट देण्यात आले आहेत.

जाणून घ्या सवलत..

प्रत्येक जणाला मोठा स्मार्ट टीव्ही आवडत असतो. मोठ्या आकाराचा टीव्ही असल्यास त्यावर प्रत्येक शो पाहण्यात एक वेगळीच मजा येते. कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही 24,999 रुपयांऐवजी केवळ 9,499 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. या सेलमध्ये टीव्हीवर उपलब्ध असणाऱ्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास हा टीव्ही 32 HD रेडी स्वस्तात खरेदी करता येईल.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यासोबत स्मार्ट स्पीकर विकत घेतले तर ते केवळ तुम्हाला1,999 रुपयांना मिळू शकेल. यात IMDb इंटिग्रेशन देण्यात आले असून ज्यामुळे तुम्ही थेट सामग्री पृष्ठावरून शो आणि चित्रपटांचे रेटिंग पाहू शकता. कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही Android 11 सह Patchwall UI 4 वर काम करू शकतो. Xiaomi ची कस्टम स्किन अलीकडे Mi TV 5X सह केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts