Minimum Balance Rule : स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC किंवा ICICI बँकेत खाते असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या राष्ट्रीयीकृत बँका आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देत असतात. तसेच या बँकांच्या ग्राहकांना काही अटी आणि नियमांचे पालन करावे लागते.
जर तुम्ही याचे पालन केले नाही तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. काय आहे नेमकं कारण जाणून घ्या.
निर्धारित मर्यादेनुसार पैसे ठेवा
मर्यादा असते समान
हे लक्षात घ्या की काही बँकांची स्वतःची सरासरी किमान शिल्लक निश्चित असते. काही बँकांची मर्यादा समान असते तर काहींची मर्यादा वेगळी असते.
SBI मध्ये किती शिल्लक ठेवावी?
स्टेट बँक ऑफ इंडिया बचत खात्यात ठेवली जाणारी किमान शिल्लक हे तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे. या बँकेच्या खात्यातील किमान मर्यादा शहरानुसार रु. 1,000 ते रु. 3,000 आहे. तर ग्रामीण भागासाठी ती मर्यादा 1,000 रुपये इतकी आहे. इतकेच नाही तर जर तुमचे खाते हे निमशहरी भागातील शाखेत असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्यात 2,000 रुपये ठेवणे गरजेचे आहे. तसेच मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3,000 रुपये इतकी आहे.
HDFC मध्ये किती शिल्लक ठेवावी?
HDFC मध्ये सरासरी किमान शिल्लक मर्यादा तुमच्या निवासस्थानावर अवलंबून आहे. शहरांमध्ये ही मर्यादा 10,000 रुपये इतकी आहे. तर निमशहरी भागात ही मर्यादा 5,000 रुपये तर ग्रामीण भागात 2,500 रुपये इतकी आहे.
ICICI मध्ये किती शिल्लक ठेवावी?
हे लक्षात ठेवा एचडीएफसी बँकेप्रमाणेच आयसीआयसीआय बँक खात्यात किमान शिल्लक ठेवणे खूप गरजेचे आहे. शहरी भागातील खातेदारासाठी 10,000 रुपये, निमशहरीसाठी 5,000 रुपये तसेच ग्रामीण भागासाठी 2,500 रुपयांची मर्यादा ठेवणे खूप गरजेचे आहे.
तसेच काही विशेष बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम लागू होत नाही. कारण या प्रकारच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री जन धन योजना, मूलभूत बचत बँक ठेव खाते, निवृत्तीवेतनधारकांचे बचत खाते, वेतन खाते तसेच अल्पवयीन बचत खाते यांच्याशी निगडित खात्यांचा समावेश आहे.