ताज्या बातम्या

Aadhaar : आधार कार्डमधील जन्मतारीख चुकलीय? काळजी करू नका घरबसल्या सोप्या पद्धतीने करा दुरुस्त

Aadhaar : कोणतेही सरकारी काम असो किंवा खासगी काम आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी खूप गरजेचे आहे. त्यामुळे आधार कार्डवरील प्रत्येक माहिती अचूक असणे खुप गरजेचे आहे. तसेच तुम्ही घरबसल्या सहज आधारवरील फोटो बदलू शकता.

घरबसल्या PVC आधार कार्ड मागवू शकता. त्याचबरोबर आधार कार्डशी फोन नंबर सोप्या पद्धतीने लिंक करू शकता. अनेकांच्या आधार कार्डमधील जन्मतारीख चुकीची असते. जर तुमचीही चुकीची जन्मतारीख असेल तर काळजी करू नका. सोप्या पद्धतीने जन्मतारीख बदलू शकता.

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

  • अनेकदा आधार कार्डमधील चुकीची जन्मतारीख छापण्यात येते.
  • त्यामुळे जर तुमच्या आधार कार्डमध्येहीचुकीची जन्मतारीख असेल, तर तुम्ही ती ऑनलाइन दुरुस्त करू शकता.
  • सगळ्यात अगोदर तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in/en/ वर जावे लागणार आहे.

स्टेप 2

  • त्यानंतर तुम्हाला तुम्हाला ‘Proceed to Update Aadhaar’ हा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या 12 अंकी आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने येथे लॉग इन करावे लागणार आहे.
  • लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरावा लागणार आहे.

स्टेप 3

  • त्यानंतर OTP पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल, तो येथे भरावा लागेल.
  • यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी टाकावे लागणार आहे.

स्टेप 4

  • त्यानंतर तुम्हाला कोणत्याही दस्तऐवजासह अपडेट करण्यासाठी ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा’ वर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुम्ही अपडेट करू इच्छित तपशील निवडावे लागणार आहे, जसे- जन्मतारीख
  • त्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक व्हेरिफिकेशन कोड येईल.
  • ते प्रविष्ट करून नंतर बदल जतन करा वर क्लिक करावे लागणार आहे.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Aadhaar

Recent Posts