अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-गेल्या तीन वर्षापासून बाजार समितीचे बंद असलेले मुख्य गेट तात्काळ उघडण्यात यावे यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान यासाठी शिवसेनेनही अनेकदा पुढाकार घेतला होता. मात्र त्यांना नेहमीच अपयश आले. मात्र आज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज महाशिवरात्रीला बाजार समितीचं बंद असलेलं ते गेट उघडलं.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडीच वर्षापासून बंद असलेले गेट शिवसेनेने आंदोलन करून कुलूप तोडून खुले केले होते.
हे गेट उघडण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट करत बाजार समितीने या घटनेची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविली आहे.
यामुळे हे नगर बाजार समितीचे काही दिवसांपूर्वी उघडलेले गेट पुन्हा शहर वाहतूक शाखेने बंद केले आहे. गेट बंद असल्याने व्यापार्यांच्या व्यवसायावर गेल्या काही वर्षापासून परिणाम झालेला आहे व आताही परिणाम होत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती हे प्रवेशद्वार उघडण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करत आहे. व त्यांची मानसिकताही दोन ते तीन वर्षापासून प्रवेशद्वार उघडण्याची दिसून येत नाही.
दरम्यान हे बंद गेट खुलं करण्याचे आदेश खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही गेट उघडले नाही. मात्र आज शिवरात्रीच्या दिवशी बाजार समितीचे बंद असलेले गेट उघडले,
मात्र ते आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत. एकदंरीतच शिवसेनेने मागणी करूनही न उघडले गेलेले गेट आज आमदार जगताप यांच्या एका प्रयत्नात उघडले गेले.