आमदार पवारांनी नागरीकांच्या आरोग्यासाठी उचलले महत्त्वपूर्ण पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आमदार रोहित पवार यांनीकर्जत मधील उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह (ऑपरेशन थेटर) उभारण्यासाठी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला.

दरम्यान सध्या नागरिकांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नगर, पुणे, मुंबई अशा शहरी भागातील खासगी रुग्णालयात जावे लागते. मात्र खासगी रुग्णालयांचे दर पाहता अनेकाना हा खर्च न परवडणारा असतो.

त्यामुळे प्रसंगी अनेकांना जीवालाही मुकावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन आमदार पवारांनी मंजूर करून आणलेल्या शस्त्रक्रिया गृहामुळे अनेकांना याचा फायदा मिळणार आहे.

रुग्णांच्या सामान्य शस्त्रक्रियांबरोबरच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियादेखील स्थानिक पातळीवर यशस्वीरित्या पार पडणार आहेत. अद्ययावत शस्त्रक्रिया गृहामुळे उपजिल्हा रुग्णालयास महत्व प्राप्त होणार आहे.

आमदार रोहित पवारांनी कोरोना काळातही आरोग्यासाठी लागणारी उपकरणे व सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व सुविधा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफतच मिळणार असल्याने रुग्णांसाठी ही आनंदाची बाब आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts