अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- रोहित्र जोडणीसाठी शेतकऱ्यांकडुन महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.
हे मला बिलकुल चालणार नाही आणि मी खपवूनही घेणार नाही. शेतकऱ्यांचे फोन वेळेत घ्या, त्यांना सहकार्य करा, तेही तुम्हाला सहकार्य करतील.
नाहीतर माझ्यासारखा विचित्र माणूस कुणी नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांवर संतापले.
कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथे ३३ के.व्ही. वीज उपकेंद्रांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो. लोकांच्या मागणीनुसार मी पाठपुरावा केला.
वरिष्ठ नेत्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आणि हे काम मार्गी लागले. शेजारील गावांना या उपकेंद्राचा फायदा होईल. खेड, भांबोरा या उपकेंद्रांवर पडणारा अतिरिक्त भारही कमी होईल.
आता इथले राजकारण बदलेल आणि विकासाच्या राजकारणाकडे सर्वांचा कल राहील, असेही ते म्हणाले