अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून मतरदार संघातील विकासकामांसाठी ४ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीमुळे अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यास हातभार लाभणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांना कृषीपंप व घरगुती विजेबरोबरच वाणिज्य, औद्योगिक कारणांसाठी विजेची आवश्यकता असते.
त्या अनुषंगाने पवार यांनी वीज वितरण कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावर वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या.
यातच कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील नवीन वीज उपकेंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्यातून २ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन हे उपकेंद्रही कार्यान्वित झाले. बाभूळगाव दुमाला येथील गावे व वाड्या-वस्त्यांसाठी नवीन ११ रोहित्रे मंजूर केली आहेत.
मांदळी येथील गावठाण वाहिनीच्या अलगीकरणासाठी ४३ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला. मांदळीसह निमगाव व परिसरातील गावात गावठाण फिडरसाठी ११ कि.मी. लांबीची नवीन उच्च दाबाची वाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे.
३ नवीन रोहित्र उभारण्यात आले आहेत. दरम्यान मतदारसंघातील नागरिकांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असल्याने नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागली जातील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.