आमदार संग्राम जगताप झाले यशस्वी ! पाच कोटी रुपयांचे…

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर शहरातील आगरकर मळा परिसरात असलेल्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळविण्यामध्ये आमदार संग्राम जगताप यशस्वी झाले आहेत.

आयुर्वेद ते काटवण खंडोबा या रस्त्याचे काम प्रशासकीय कारवाई नंतर लगेचच सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.

रेल्वे स्टेशन, आगरकर मळा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.

हा रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली होती. आठ कोटी 50 लाख रुपयांचा निधी त्यासाठी आवश्यक आहे.

हा निधी मिळावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे.

पहिल्या टप्प्यात ‘ठोक अनुदान’ या लेखाशी शिर्षातर्गत पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित साडेतीन कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे.

कोठी, बालिकाश्रम रोडनंतर आता नगर शहरामध्ये आयुर्वेद ते काटवन खंडोबा रस्ता रोल मॉडेल होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts