ताज्या बातम्या

मनसेची नौटंकी सुरू आहे, भोंग्याच्या नावाने बावल्या नाचत आहेत’ किशोरी पेडणेकर

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठा वाद निर्माण होऊ पाहत आहे, कारण मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंगे हटवण्यावरून आक्रमक झाले असून राज्य सरकारकडून मात्र याला विरोध केला जात आहे.

यातच आता महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या मुद्द्यावरून मनसे व भाजपवर (Bjp) जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मी या चित्रपटाकडे (Film) कुठल्याही पद्धतीने बघत नाही. पण भोंग्याच्या नावाने ज्या बावल्या नाचत आहेत, त्यांना बघत आहे’ असे त्या म्हणाल्या आहेत.

तसेच किशोरी पेडणेकर म्हणाल्या, भोंग्या वरून धार्मिक सामाजिक राजकारण (Politics) करायचं धार्मिक तेढ निर्माण करायचं काम करीत आहेत. भोंगा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी कमर्शियल प्रमोशन (Commercial promotion) करण्यासाठी आणि तुंबड्या भरण्यासाठी हे सर्व करत आहेत.

जनता वेडी नाही काय तुमचे चाळे चालले आहेत हे जनतेला कळत आहे, कमर्शियल चाळ्यात धार्मिक तेढ निर्माण करत आहात. दोन बाजूनी तुम्ही काम करत आहात एका बाजूला पक्षाला उभारी आणि एका बाजूला कमर्शिअल उभारी” अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे.

दरम्यान, ‘२०१८ ला कोव्हिड आलाच नाही. २०१९ ला मार्चमध्ये कोव्हिड आला. २२, २४ महिने काय केलं. हा भो वाजणार होतात. २०१९ ला पण त्या वेळेला ‘लाव रे तो व्हिडिओ’ वाजला त्यावेळेला काय कमर्शियल झालं ते माहिती नाही.

मनसेची नौटंकी सुरू आहे.. सगळ्यांना माहिती आहे. आता चिथावणी देत आहेत पहिला स्वतःचा भोंगा आणि आता कमर्शियल भोंगा, मी आरोप करत नाही.

जनते मधली कुजबुज आहे भाजप आणि मनसे संगनमतान हे सगळे राजकारण करत आहे’ असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts