अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र शाळा बंद असून सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. यामुळे मोबाईल ही गरजेची वस्तु बनलेली आहे. मात्र, एका विद्यार्थीनीने ऑनलाईन क्लाससाठी घेवून दिलेल्या मोबाईलचा वापर भलत्याच कामासाठी केला.
मुलीचे कृत्य पाहून तिच्या वडिलांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. अहमदाबादमध्ये घडलेल्या या घटनेमुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांची चिंता वाढली आहे.
ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी या मुलीला तिच्या वडिलांनी मोबाईल घेवून दिला होता. मात्र, ऑनलाईन शिक्षण घेत असतानाच एका अल्पवयीन मुलीने आपले न्यूड व्हिडीओ बनवले आणि सोशल मीडियावर शेअर केले.
मुलीने केलेले कृत्य तिच्या पालकांना समजले. या धक्क्यामुळे तिच्या वडिलांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. या मुलीचे आई-वडील दोघेही नोकरी करत होते. यामुळे मुलगी बहुतांश वेळा घरी एकटीच असायची.
यादरम्यान ती सोशल साइट्सवर जास्त वेळ व्यतीत करू लागली यातूनच तिला वाईट संगत लागली. सोशल मीडियावर काही मुलींचे न्यूड व्हिडीओ पाहिल्यावर आणि त्याखाली मुलांनी केलेल्या शेकडो कमेंट पाहिल्यावर या मुलीनेही आपले न्यूड व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले.
सहज म्हणून तिने एक न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यावर भरपूर कमेंट आल्या. या कमेंट पाहून अल्पवयीन मुलीला न्यूड व्हिडीओ बनवण्याचे व्यसन लागले.
या अल्पवयीन मुलीच्या मावशीच्या मुलीने इन्स्टाग्राम अकाउंटवर बहिणीचे न्यूड व्हिडीओ पाहिले यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
या मुलीच्या आई-वडिलांनी हे व्हिडीओ पाहिले तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसला. दोघांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका बसला. स्वत:ला सावरत या मुलींच्या पालकांनी या मुलीचे समुपदेशन केले.