नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या थ्रीडी प्रतिमेचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारनं सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेताजी बोस यांची जयंती यावर्षीपासून पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. त्यानिमित्ताचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा फोटो देखील जारी केला होता. जोपर्यंत पुतळा तयार होत नाही तोपर्यंत नेताजी बोस यांची होलोग्राम स्वरुपातील प्रतिमा तिथं असेल.

मोदी आज त्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. होलोग्राफिक हे डिजीटल तंत्र आहे. हे प्रोजेक्टर सारखं काम करतं. यामध्ये कोणतीही गोष्टी थ्रीडी स्वरुपात दाखवता येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: IndiaPM modi