Maharashtra News:स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानही राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आव्हान केले की सोशल मीडिया आकाऊंटवर तिरंग्याचा डीपी ठेवा.
त्यानंतर देशभरात अनेक नेते, सेलेब्रिटी आणि नागरिकांनी मोदींना प्रतिसाद देत डीपी बदलले आहेत.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही आपला डीपी बदलला आहे. मोदी यांच्या आवाहनानुसार त्यांनीही डीपीमध्ये तिरंग्याचा समावेश केला आहे.
मात्र, हा तिरंगा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हातात घेऊन फडकवत आहेत, असा फोटो गांधी यांनी डीपीला ठेवला आहे. यासोबत केलेल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की,”तिरंगा हा देशाचा अभिमान आहे.
तो प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आहे”.राहुल गांधी यांची ही कृती मोदींना प्रत्युत्तर मानली जात आहे. राहुल यांच्यानंतर अनेकांना पंडित नेहरू यांचे राष्ट्रध्वज हातात घेतलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
मोदी आणि भाजप यांचा नेहरूंना नेहमीच विरोध राहिला आहे. तर दुसरीकडे आपणच तिरग्यांचा सन्मान करीत असल्याचे भाजपकडून भासविले जाऊ लागले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून गांधी यांनी तिरंग्यासह नेहरूंचा फोटो डीपीला ठेवल्याचे मानले जात आहे.