Monkeypox : सध्या मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूने भारतात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत (Delhi) मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण (Patient) आढळून आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने कोणताही परदेशी प्रवास (Foreign Travel) केला नाही. या रुग्णाला दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलजेमध्ये (Maulana Azad Medical College) दाखल करण्यात आले आहे.
कोणताही प्रवास इतिहास नसलेल्या 31 वर्षीय पुरुषाला ताप आणि त्वचेवर जखम झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतातील या आजाराची ही चौथी घटना आहे. सूत्रांनी सांगितले की, हा माणूस नुकताच हिमाचल प्रदेशातील मनाली (Manali) येथे एका पार्टीत सहभागी झाला होता.
पश्चिम दिल्लीतील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने सुमारे तीन दिवसांपूर्वी येथील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याचे नमुने शनिवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे पाठवण्यात आले, त्यानंतर नमुने पॉझिटिव्ह आढळले. रुग्णाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
केरळमध्ये आतापर्यंत 3 रुग्णांची पुष्टी झाली आहे
दक्षिण केरळमधील कोल्लम जिल्ह्यात 14 जुलै रोजी देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. दुसरा केस 18 जुलैला आणि तिसरा केस 22 जुलैला केरळमध्येच नोंदवला गेला. हे तिघेही परदेश दौरे करून परतले होते.
नुकतेच केरळ सरकारने मंकीपॉक्सच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर एसओपी जारी केला होता. यानुसार, जवळच्या संपर्कातील व्यक्तीला ताप असल्यास त्यांना वेगळे करावे आणि अंगावर लाल ठिपके दिसल्यास त्यांचे नमुने मंकीपॉक्स तपासणीसाठी पाठवावेत.
मंकीपॉक्सने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली
आत्तापर्यंत केरळमध्येच मंकीपॉक्सचे तीन प्रकरणे समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. WHO ने सर्व देशांना या मुद्द्यावर गंभीर होण्याचे आवाहन केले आहे.
यामध्ये पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पीडित समाजातील लोकांचे आरोग्य, मानवी हक्क आणि प्रतिष्ठेची विशेष काळजी घेण्यात यावी. जगातील 75 देशांमध्ये पँकीपॉक्सची 16 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.
आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, या आजाराचा प्रादुर्भाव जगभर वेगाने पसरत आहे. तो कोणत्या माध्यमातून पसरत आहे, याबद्दल आपल्याकडे फारच कमी माहिती आहे.