Rain In Maharashtra : देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेली सामान्य जनता गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होती ती मान्सुन (Mansoon) आगमनाची. आता मान्सूनचे केरळमध्ये दणक्यात आगमन झाले (Mansoon Arrived In Kerala) आहे.
यामुळे निश्चितच शेतकऱ्यांमध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये मोठ्या समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे. रविवारी केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) स्पष्ट करण्यात आले.
खरं पाहता, दर वर्षी मान्सून हा एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. गतवर्षी मान्सून हा तीन जूनला केरळमध्ये आला होता. मात्र यावर्षी आसनी चक्रीवादळामुळे मान्सून प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने मान्सूनने तब्बल तीन दिवस आधी केरळ मध्ये एन्ट्री घेतल्याचे सांगितले जात आहे.
कारण कुठलेही असो मान्सून आगमनाने सर्व कसं प्रफुल्लित झाल आहे. चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर मान्सूनच्या आगमनामुळे मोठे प्रसन्न भाव बघायला मिळत आहेत.
भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे औपचारिक रित्या जाहीर केले. या दरम्यान भारतीय हवामान विभागाचे मेसेज मान्सून आता पुढील प्रवासासाठी वेग धरू लागला असून
असंच सुरळीत सुरू राहिले तर मान्सून हा दहा जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार आहे. याशिवाय पुढील दोन दिवसात कोंकण आणि मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पाऊस (Pre Mansoon Rain) बघायला मिळू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
खरं पाहता, भारतीय हवामान विभागाने तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणा-या खासगी संस्थां स्कायमेटने या वर्षी मान्सून हा लवकरच दाखल होणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. हवामान विभागानुसार यावर्षी 27 मेला मान्सून केरळमध्ये धडकणार होता
तर स्कायमेंटच्या मते मान्सून हा 26 मेला केरळमध्ये आगमन करणार होता. मात्र या दोघांचा अंदाज मान्सूनने चुकवला. परंतु असे असले तरी या वर्षी नेहमीपेक्षा मान्सूनने लवकरच हजेरी लावली. यामुळे सर्वीकडे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
राज्यात या ठिकाणी कोसळणार मान्सूनपूर्व पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत कर्नाटकसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले असल्याने
या भागात मान्सूनपूर्व पाऊस बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रात 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता असली तरी त्याआधी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.