खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आरोप करणे चुकीचे !

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर राजकीय आकसापोटी व पक्षश्रेष्ठींना खूष करण्यासाठी सूडबुद्धीने काही तथाकथित समाजसेवकांनी आरोप केले आहेत.

वास्तविक त्यांचा आजपर्यंतचा सामाजिक वा राजकीय इतिहास पाहता त्यांचे समाजाप्रती किती आणि काय योगदान आहे, हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे, असे कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीचे सदस्य सुरेशराव बानकर यांनी म्हटले आहे.

खासदार डॉ. विखे यांच्यावर रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत काहींनी केलेल्या आरोपाबाबत बानकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अशा लोकांनी कोरोनाच्या या संकट काळात जनतेला आधार देण्यासाठी खासदार विखेंकडून सुरु असलेल्या

या चांगल्या कामात अशा प्रकारचा अडथळा आणून आपल्या महत्वाकांक्षी वृत्तीचं दर्शन दाखवुन दिलं आहे. फक्त व्यक्तीद्वेषापोटी विखे घराण्याच्या विरोधात असले प्रकार करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे.

स्वत: काही करायचं नाही आणि दुसरे करत असेल तर त्यांनाही काही करू द्यायचं नाही अशी भूमिका आरोप करणारे घेत आले आहेत. अशा प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले.

या कामास गालबोट लावणारी, राजकारण करणारी, दुष्ट हेतू बाळगून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारी घटना आहे. या घटनेमुळे यापुढे कोणीही खासदार डॉ. विखे पाटील यांच्यासारखे सहकार्य करण्यास धजावणार नाही, अशी खंत बानकर यांनी व्यक्त केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts