अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- देशासह महाराष्ट्रात कोरोना संसर्गचे प्रमाण पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेत करोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना या नकारात्मक वातावरणातही एक ऊर्जा देणारी सकारात्मक बातमी डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आली आहे.
गंगुबाई बर्डे वय ७० रा,वरवडे, ता.राहुरी येथील आजींनी १४ दिवस कोरोनाशी झुंज देऊन कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ, व्हेंटिलेटर, ऑक्िसजन बेडची कमतरता जाणवत आहे.
अशातच मुळा धरणाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या गंगुबाई बर्डे यांना कोरोनाने गाठले. यांचा मुलगा अंकुश बर्डे याने वेळेत चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईसाठी ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडसाठी खूप प्रयत्न केला.
परंतु सगळीकडे नकारघंटा मिळाल्याने त्याने सरळ खासदार डॉ.सुजय विखे यांना गाठले. गंगुबाई यांची ऑक्सिजन लेवल ४८ ते ५० पर्यंत खालावली होती. एचआर सिटी स्कोर २२ होता. अशातच घाबरलेल्या मुलाने आईच्या तब्येती बद्दल खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना सांगितली.
मिटिंग सोडून खासदारांनी रुग्णांकडे धाव घेत त्यांना आधार देत त्यांना विळद घाट येथे व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देत मानसिक आधार दिला.
आज दि.७ रोजी कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या वयोवृध्द आजीने आठवण झाली त्या पोराची आणि चांगल्या उपचारांबद्दल खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना आत्मियतेने जवळ घेवून गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा असा आशीर्वाद दिला.