खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! आम्ही साखर वाटून मते…

Ahmednagar Politics News : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गावच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना मंजूर करून त्याचे काम सुरू आहे, नगर एमआयडीसी येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.

त्यामुळे पुढील एक वर्षांमध्ये सुमारे पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ५० वर्षांच्या काळामध्ये विखे परिवाराने नेहमीच जनतेच्या प्रश्‍नावर काम केले आहे.

विकास कामाला प्राधान्य दिले. साखर वाटण्याची हिंमत आमच्यात आहे, आम्ही साखर वाटून मते मिळवणारे ‘लोक नाहीत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

आदर्श गाव मांजरसुंबा येथे विविध विकास कामाचे उद्घाटन तसेच साखर व दाळवाटप कार्यक्रम संपन्न झाली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच मंगल कदम, उपसरपंच जालिंदर कदम, शंकर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विवेक नाईक, विजय शेवाळे, ताराचंद डोंगरे, जयराम कदम, भाऊसाहेब कदम, रूपाली कदम, प्रशांत कदम, चंद्रभान कदम,

भागवत कदम, गोवर्धन कदम, पांडुरंग कदम आदी उपस्थित होते. श्री. कडिले म्हणाले की, आदर्श गाव मांजरसुंबा हे शहरापासून अवघे १५ किलोमीटरचे अंतर असून, या ठिकाणी गोरक्षनाथ गड आहे. भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.

त्यांच्यासाठी तसेच वन विभागाच्या जागेवर पर्यटन स्थळाची निर्मिती व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला असून, सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले आहे. मांजरसुंबा गावाला पर्यटनातून चालना मिळेल व ते एक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts