महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवेच्या (मुख्य) लेखी परीक्षेचा निकाल बुधवारी प्रसिद्ध झाला. एकूण १ हजार ९५४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.
मुलाखतीला पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आयोगाकडून २१, २२ व २३ जानेवारी २०२३ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली.
दहा महिन्यांच्या कालावधीनंतर निकाल जाहीर झाला आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवाराची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीला बोलावण्यात येणार आहे.
उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास संबंधित उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम रद करण्यात येईल.
मुलाखतीकरिता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची असल्यास अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
अमरावती विभागातून ५८, औरंगाबाद विभागातून २१०, मुंबई विभागातून १२९, नागपूर विभागातून ८६, नाशिक विभागातून १३३ आणि पुणे विभागातून ९ हजार ३४६ उमेदवार पात्र ठरले आहेत.