ताज्या बातम्या

MSRTC News : ह्या बसने केली एका महिन्यात २ कोटींची कमाई ; प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

MSRTC News : एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १४ हजार बसेस आहेत. डिझेल गाड्यांच्या वाढत्या खर्चामुळे व पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याकरता मुंबई, ठाणे, पुणे मार्गावर इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला.

त्यानुसार १ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-पुणे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या पहिल्या ई शिवनेरी बसचे उद्घाटन केले. सद्यस्थितीत ठाणे-पुणे आणि मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई शिवनेरी बसेसना चांगला प्रतिसाद मिळत असून, ४८ हजार ५२० प्रवाशांनी प्रवास केला आहे.

याद्वारे अवघ्या एका महिन्यात तब्बल २ कोटींची कमाई झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाईल चार्जिंग आणि प्रकाशदिवे, बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था आणि बसमध्ये ४३ प्रवासी आसन क्षमता असणाऱ्या ई शिवनेरी बसचे १ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

ठाणे- पुणे आणि मुंबई-पुणे मार्गावर धावणारी ई शिवनेरी बस एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर ३०० किमीचा टप्पा पार करत आहे. जलद आणि आरामदायी प्रवास असणाऱ्या या बसेसना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या एका महिन्यात या मार्गावर ४८ हजार ५०० प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून २ कोटींची भरघोस कमाई एसटी महामंडळाने केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: MSRTC News

Recent Posts