ताज्या बातम्या

MSRTC Shivshahi Bus : नुसती नावालाच ‘शिवशाही’ ! प्रत्यक्षात नागरिकांचे फक्त हाल…

MSRTC Shivshahi Bus :प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबत थंडगार प्रवास देण्यासाठी २०१७ मध्ये वातानुकूलित शिवशाही बस सेवेत आणण्यात आल्या. या गाड्या बाहेरून दिसायला शाही असल्या तरी बसमधील वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, अस्वच्छ सीट कव्हर आणि पडदे, नादुरुस्त आणि बंद एसी यंत्रणा यामुळे भर उन्हाळ्यात एसी शिवशाही बसने प्रावाशांना घाम फोडला आहे.

सातत्याने होणार्या ह्या अशा घटनांमुळे शिवशाही बसकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

अश्या आहेत तक्रारी

■वारंवार एसी बिघाड

■इंजिन बिघाड

■पिकअप नसणे

■ बसमधील सीट कव्हर आणि पडदे अस्वच्छ

■बसमधील एसी चालू होताच मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडणे

बससेसचे अपघात वाढले

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ९९० शिवशाही बस आहेत. यापैकी ९०० बस स्वमालकीच्या असून ९० बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. सुरुवातीला ‘शिवशाही’चा प्रवास आरामदायी आणि गारेगार असल्यामुळे ती प्रवाशांच्या पसंतीला उतरली. ‘शिवशाही’ चे तिकीट अन्य बसपेक्षा अधिक असूनही प्रवाशांची गर्दी होत होती. मात्र मागील काही दिवसांपासून या बससेसचे अपघात वाढले आहेत.

वातानुकूलित शिवशाही बसेसना पसंती

कधी अपघाताच्या घटनांनी तर कधी बिघाडाच्या घटनांनी शिवशाही बस चर्चेत राहिली आहे. अशातच एप्रिल महिन्यापासून असलेल्या कडक उन्हापासून बचावासाठी प्रवाशांनी इच्छित स्थळी जाण्यासाठी वातानुकूलित शिवशाही बसेसना पसंती दिली. तिकिटासाठी इतर पर्यायी सेवांपेक्षा अधिकची रक्कम मोजून शिवशाही बसप्रवास करण्यात आला.

एसी दुरुस्त करूनच ‘शिवशाही’ मार्गावर आणा

तिकिटाच्या तुलनेने आवश्यक सेवा मिळत नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. यामध्ये सर्वाधिक तक्रारी एसी बिघाडाच्या असल्याच निदर्शनास आले. दरम्यान, इतर सार्वजनिक वाहतुकीपेक्षा अधिकचे पैसे देऊन देखील प्रवासाचा आनंद मिळत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामंडळाने एसी दुरुस्त करूनच ‘शिवशाही’ मार्गावर आणाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

वारंवार इंजिन बिघाड आणि वातानुकूलित यंत्रणा बिघाड

शिवशाही बसेसची बांधणी ही जुन्या एसटी बसेसच्या सांगाड्यांवर करण्यात आली आहे. जुन्या साधारण एसटी बसेसची इंजिन शक्ती आणि वातानुकूलित बसेसची इंजिनशक्ती वेगवेगळी असणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. जुन्या इंजिनशक्ती आणि सांगाड्यावर शिवशाही बस तयार करण्यात आल्याने वारंवार इंजिन बिघाड आणि वातानुकूलित यंत्रणा बिघाड अशा घटना घडत आहेत. यामुळे शिवशाही बसेस पहिल्या दिवसापासूनच डिफेक्टेड असल्याचे उघड झाले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts