MSSC vs SSY : कोणती गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची? MSSC की SSY? जाणून घ्या सविस्तर

MSSC vs SSY : सरकार सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते, ज्याचा तुम्ही देखील सहज लाभ घेऊ शकता. केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. ज्यात उत्तम परतावा मिळतो.

परंतु अनेकांना आपल्यासाठी कोणती योजना फायदेशीर आहे, ज्यात उत्तम परताव्यासह शानदार फायदे मिळतात. जर तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल तर काळजी करू नका. बातमी शेवटपर्यंत वाचा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना?

खास महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली आहे. यात तुम्हाला दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवता येऊ शकतात. खात्यात जमा करण्यात आलेल्या रकमेवर सरकार एकूण 7.5 टक्के दराने व्याज देत आहे.

हे व्याज तिमाही आधारावर खात्यात जमा होते. पहिल्या वर्षानंतर खातेदारांना 40% दराने पैसे काढण्याची सुविधा देखील मिळते. तुम्ही ऑक्टोबर 2023 मध्ये MSSC खाते चालू केले तर तुम्हाला ऑक्टोबर 2025 पर्यंत खात्याची मॅच्युरिटी मिळेल.

हे खाते चालू करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागणार आहे. त्या ठिकाणी जाऊन एक फॉर्म भरावा लागणार आहे, त्यानंतर केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार आणि पॅन कार्डची माहिती देणे अनिवार्य आहे. यानंतर, खात्यातून पैसे रोख किंवा चेकमध्ये जमा केले जातात. यानंतर तुमचे एमएसएससी खाते चालू केले जाईल. या योजनेची खास बाब म्हणजे कोणत्याही वयोगटातील महिला या योजनेमध्ये खाते चालू करू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना

खास मुलींसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 10 वर्षांच्या मुलीच्या नावाने SSY खाते चालू करता येते. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर 8 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत प्रत्येक वर्षी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवण्याची गरज असते. यासोबतच मुलीच्या नावावर 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. यानंतर, मुलगी 18 वर्षांची झाली की 50 टक्के पैसे काढता येतात. ही योजना आयकरात सवलत देते.

कोणती गुंतवणूक फायद्याची?

MSSC आणि SSY या दोन्ही योजना महिलांसाठी आहेत. परंतु दोन्हीमध्ये खूप फरक आहे. MSSC ही एक लहान बचत योजना असून SSY ही दीर्घकालीन बचत योजना आहे. कोणतीही महिला MSSC मध्ये तर SSY फक्त मुलींसाठी सुरु केली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही योजना निवडू शकता. तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असल्यास तर SSY हा उत्तम पर्याय आहे. अल्प मुदतीसाठी, एमएसएससी योजना हा एक उत्तम पर्याय असेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts