मनपा महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन!

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रूग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. ४५ वर्षा वरील नागरिक देखील लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रावर गर्दी करित आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रूग्णांना आवश्यक असणारा रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली.

इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना इंजेक्शन पुरवठा तातडीने करणे बाबत पत्र देण्यात आले. शासनाने देखील दखल घेवून रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा शहर व जिल्हयासाठी केला आहे.

मनपाच्या वतीने रूग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील स्वत:ची व आपल्या परिवाराची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अत्यंत आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर पडावे.

महानगरपालिकेच्या विविध आरोग्य केंद्रातील लसीकरण व तपासणी केंदाचा मा.महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे यांनी भेट देवून पाहणी केली असता त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली.

यावेळी मनपाच्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसेच नागरिकांना देखील शिस्तीचे पालन करावे. सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे रहावे. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होवू नये असे ते म्हणाले. लसीकरण करण्यासाठी सुचनांचे पालन केल्यास सर्वांना लस मिळणार.

मनपाच्या तोफखाना, केडगांव, सावेडी, मुकुंदनगर, नागापूर आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे.

या ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करू नये. शिस्तीचे पालन करून लस घ्यावी. कोरोना रूग्णांनी घाबरून न जाता कोवीड सेंटर मध्ये दाखल होवून योग्य ते उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts