अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-अहमदनगर महानगरपालिकेच्या कामगारांचं वेतन आणि पेन्शनचा प्रश्न गंभीर झाला असून राज्यशासन यासंदर्भात बेफिकीर आहे तर अहमदनगर महानगरपालिका उदासिनता दाखवित आहे, असा आरोप कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केला आहे.
दरम्यान लोखंडे यांनी यासंदर्भात महापौर बाबा वाकळे यांना एक निवेदन दिलं आहे. यामध्ये लोखंडे यांनी म्हटलंय, की कोरोनाच्या संकटात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महानगरपालिकेचे कामगार राबत आहेत.
या कामगारांना संनिटायझर, मास्क, जम बूट आदी सुविधा तातडीनं द्याव्यात. कामगारांच्या घरात कोणी आजारी असेल तर त्वरित बेड, आॅक्सिजन, रेमडिसिविर इंजेक्शन आदी उपलब्ध करुन द्यावेत.
वेतन आणि पेन्शन मिळत नसल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यशासनाच्या मवीन नियमानुसार कार्यालयीन कामगारांची १५ % आणि अत्यावश्यक सेवेतल्या कामगारांची ५० % उपस्थिती ठेवण्याबाबत कार्यालयीन आदेश देण्यात यावेत.
दरम्यान, या सर्व मागण्या मान्य न झाल्यास दि. २७ एप्रिलपासून महानगरपालिकेचे कामगार बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.