मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा दावा केलाय. 2024 ला मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच (Congress CM) असेल असा दावा पटोले यांनी केलाय. यांनी २०२४ च्या निवडणुकांबाबत मोठे ट्विट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.
त्यानंतर काँग्रेसने दिल्ली मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली होती. या बैठकीला सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी, आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते.
राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी हे राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अशा प्रकारचा कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही.
येत्या काळात काँग्रेस देशपातळीवर चिंतन शिबिर घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ट्विट (Tweet) केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी मोठा दावा केला आहे.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल. अशा आशयाचे ट्विट नाना पाटोळे यांनी केले आहे.
नाना पटोले यांनी भाजप मुक्ती पॅटर्न राबवण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने सत्तेत येताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
सत्तेत आल्यापासून भाजपाने संविधान संपवण्याचे काम सुरु केले आहे. तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पापही केले जात आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे.
भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून आज लातूरमधून भाजपमुक्तीची सुरुवात झाली असून आता हे वातावरण मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले पाहिजे यासाठी जोमाने काम करा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.