ताज्या बातम्या

Narak Chaturdashi 2022 : छोट्या दिवाळीला घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी करा ‘हे’ काम, टळून जाईल अकाली मृत्यू

Narak Chaturdashi 2022 : हिंदू धर्मातील प्रत्येक सण-उत्सवाची तिथी पंचांगानुसार ठरते. पंचांगानुसार,अश्विन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) साजरा करतात.

दिवाळीतील (Diwali) नरक चतुर्दशीला (Narak Chaturdashi on 2022) विशेष महत्त्व दिले आहे. या दिवशी भगवान कृष्णाची आणि काली मातेसोबत यमदेवतेचीही पूजा करतात.

नरक चतुर्दशीला हे उपाय करा

नरक चतुर्दशीच्या दिवशी (Narak Chaturdashi in 2022) घराच्या मुख्य दरवाजावर यम नावाचा दिवा लावला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार यमदीपक घरातील ज्येष्ठ महिलेने प्रज्वलित करावे. असे केल्याने सर्व मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या अकाली मृत्यूचा धोका टळतो, असे मानले जाते.

यम दिव्याशिवाय घरातील ज्येष्ठांनीही घरात चार तोंडी दिवा लावावा. ते जाळल्यानंतर, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवा आणि प्रत्येक संकटातून मुक्तीसाठी प्रार्थना करा. यानंतर हा दिवा घरापासून दूर असलेल्या ठिकाणी ठेवा, हा उपाय केल्यास घरातून अकाली मृत्यूचे संकट टळते.

यमदीप पेटवताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळीच्या (Chhoti Diwali) दिवशी संध्याकाळच्या वेळी घरातील ज्येष्ठ व्यक्तीने यम दिवा लावावा.
  • हा दिवा लावल्यावर कोणीही त्याच्या जवळ जाऊ नये.
  • यमदीप प्रज्वलित केल्यानंतर, घरातील मुले किंवा आजारी लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी.
  • दिवा संपत नाही त्याच जागी बसा.
Ahmednagarlive24 Office

Recent Posts