नारायण राणे भडकले…कोण अजित पवार? मी ओळखत नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना.(Narayan Rane) (Ajit Pawar)

त्यांचा काय संदर्भ देताय?, अशा खोचक शब्दांत राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणेंवर आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे याप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. अशातच आता या सगळ्या प्रकारावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत हे वक्तव्य केलं आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंवर आरोप करण्यात आला आहे. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांना विधानभवनाबाहेर नितेश राणे यांनी केलेल्या वर्तनावर प्रश्न विचारण्यात आला. तसेच अजित पवार यांनी आज सभागृहात सदस्यांना समज दिल्याचंही राणेंना सांगण्यात आलं. त्यावर राणे संतापले माझी मर्यादा काय आहे हे मला माहीत आहे.

मी बाकी कोणाची पर्वा करत नाही. कायद्याने वागायचं मला कळतं. माझ्या पदाचा मी दुरुपयोग केला नाही. एवढे वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे. मी अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नाही. विधान भवनाच्या पायरीवर बोलण्यावर बंधन नाही. तो संसदीय शब्द नाही. कोण अजित पवार?

मी ओळखत नाही त्या अजित पवारांना. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यांचा काय रेफरन्स देता? असा सवाल राणेंनी केला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts