नरेंद्र मोदी म्हणजे सबके साथ विश्वासघात – सत्यजीत तांबे

4 years ago

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-केंद्र सरकारतर्फे होत सातत्याने असलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली  विश्वासघात आंदोलन केले.

हे आंदोलन राज्यव्यापी असून महाराष्ट्रात प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात हे आंदोलन एकाचवेळी घेण्यात आले आहे.रोजच होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक कंटाळून गेले आहेत.

त्यामुळे युवक काँग्रेसच्या या आंदोलनात सामान्य नागरिकांचा उस्फुर्त सहभाग दिसून येत आहे. अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मीरा भाईंदर शहराच्या दौऱ्यात स्थानिक कलाकार व साहित्यिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

याचवेळी त्यांनी मिरारोड भाईंदर शहराचे विश्वासघात आंदोलनात नेतृत्व करताना केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार टीका केली.

सबका साथ, सबका विकासाचा नारा देऊन मोदींनी २०१९ साली दुसऱ्यांदा सत्ता हातात घेतली. इंधन आणि घरगुती गॅसचे दर कमी होतील हेही आश्वासन देत ते सत्तेवर आले होते.

परंतु सत्तेवर आल्यापासून सतत इंधनाचे दर वाढवून आणि इतर प्रत्येक बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात केला आहे,म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने याविरोधात विश्वासघात आंदोलन केले आहे.

कोरोनामुळे सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. सरकारने युवक आणि सामान्य जनतेसाठी काही आर्थिक मदत करणे अपेक्षित होते. ती मदत काही मिळाली नाही

याउलट रोजच होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक बोजा लादला जात असल्याने युवक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसच्या या आंदोलनात सामान्य नागरिकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला.

मोदींनी सत्तेत येण्यासाठी प्रत्येक वर्गाला आश्वासने देऊन त्यांची मते घेतली आणि सत्तेत आल्यावर मात्र विश्वासघात केला.पहिल्यांदा वापरून घ्यायचं आणि नंतर विश्वासघात करायचा ,

ही मोदींची जुनी सवय आहे. मोदी हे आता सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे ऐकून सुद्धा घेत नाही. म्हणूनच महाराष्ट्र युवक काँग्रेसच्यावतीने रस्त्यावर यायची गरज पडली असे प्रतिपादन यावेळी सत्यजीत तांबे यांनी केले.

Recent Posts