Navratri 2022 : गणरायाला निरोप दिल्यानंतर सगळेजण शारदीय नवरात्राचे (Navratri) आतुरतेने वाट पाहत आहेत. आश्विन महिन्यातील (Ashwin month) शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रीला सुरुवात होते.
हा सण उपवास आणि जागरण करून साजरा (celebrated) करतात. प्रत्येक वर्षी देवीचे वाहन वेगळे असते. यामागे काही चांगले वाईट संकेत असतात.
देवीची सवारी कशी ठरवली जाते?
ज्योतिषशास्त्रानुसार रविवार किंवा सोमवारपासून नवरात्र सुरू होते तेव्हा देवी हत्तीवर (Elephant) स्वार होऊन येते. गुरुवार किंवा शुक्रवारपासून नवरात्र सुरू झाल्यास देवी पालखीत येते.
त्याचवेळी मंगळवार किंवा शनिवारपासून नवरात्र सुरू झाल्यास देवी घोड्यावर स्वार होऊन येते. नवरात्र बुधवारपासून सुरू झाले, तर देवीहोडीत येते.
हत्तीची सवारी विशेष का आहे?
नवरात्रीत जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा पावसाची (Rain) शक्यता खूप वाढते, असा समज आहे. त्यामुळे आजूबाजूला हिरवळ पसरू लागते आणि निसर्गसौंदर्य शिगेला पोहोचते. मग पिकेही चांगली येतात.
जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा ती अन्न आणि पैशाचा (Money) साठा भरते. संपत्तीत वाढ होते. देवीचे हत्ती किंवा बोटीवर येणे हे साधकांसाठी अत्यंत शुभ मानले जाते.
शारदीय नवरात्री पूजा पद्धत
नवरात्रीच्या सर्व दिवसांत सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करा. कलशात गंगाजल भरा आणि तोंडावर आंब्याची पाने ठेवा.
कलशाच्या गळ्यात पवित्र लाल धागा किंवा मोळी गुंडाळा आणि नारळ लाल ओढणीने गुंडाळा. आंब्याच्या पानांच्या वर नारळ ठेवा. कलश जवळ किंवा मातीच्या भांड्यावर ठेवा.मातीच्या मडक्यात सातूचे बी पेरा आणि नवमीपर्यंत रोज थोडे पाणी शिंपडावे.
या नऊ दिवसांमध्ये देवी मंत्रांचा जप करा. देवी ला तुमच्या घरी बोलवा. देवतांचीही पूजा करा, ज्यामध्ये फुले, कापूर, अगरबत्ती, सुगंध आणि शिजवलेल्या पदार्थांनी त्यांची पूजा करावी.
आठव्या आणि नवव्या दिवशी तीच पूजा करा आणि नऊ मुलींना तुमच्या घरी बोलवा. या नऊ मुली देवीच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून, त्यांना स्वच्छ आणि आरामदायक ठिकाणी बसवा आणि त्यांचे पाय धुवा. त्यांची पूजा करा, त्यांच्या कपाळावर तिलक लावा आणि त्यांना स्वादिष्ट भोजन द्या. दुर्गापूजेनंतर शेवटच्या दिवशी घट विसर्जन करावे.
शारदीय नवरात्रीची तारीख
प्रतिपदा (देवी शैलपुत्री): 26 सप्टेंबर 2022
द्वितीया (देवी ब्रह्मचारिणी): 27 सप्टेंबर 2022
तृतीया (देवी चंद्रघंटा): 28 सप्टेंबर 2022
चतुर्थी (देवी कुष्मांडा): 29 सप्टेंबर 2022
पंचमी (देवी स्कंदमाता): 30 सप्टेंबर 2022
षष्ठी (देवी कात्यायनी): 01 ऑक्टोबर 2022
सप्तमी (देवी कालरात्री): 02ऑक्टोबर 2022
अष्टमी (देवी महागौरी): 03 ऑक्टोबर 2022
नवमी (देवी सिद्धिदात्री): 04 ऑक्टोबर 2022
दशमी (देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन): 05 ऑक्टोबर 2022