मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी खालच्या पातळीच्या शब्दात लिहिणाऱ्या केतकी चितळेला (Ketaki Chitale) अटक करण्यात आली असून आतापर्यंत केतकीविरोधात जवळपास २० गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत.
सुरूवातील केतकी चितळेला नवी मुंबईतल्या (Navi Mumbai) कळंबोली पोलिसांनी (Navi Mumbai Police) अटक केली, त्यानंतर ठाणे पोलिसांनी (Thane Police) तिला ताब्यात घेतलं. ठाणे कोर्टानं (Court) केतकीला तीन दिवासांची पोलीस कोठडी दिली.
पोलीस कोठडी संपताच केतकीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिला पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावाली. मात्र हे प्रकरण इथेच थाबलं नाही. तर दुसऱ्याच दिवशी केतकीचा ताबा हा नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी एका जुन्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात घेतला. त्यानंतर कोर्टाने तिला पुन्हा पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आता केतकीच्या विरोधात ती राहत असलेल्या सोसायटीतील (Society) शेजाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केतकीकडे ज्या कंपनीचे लोक फूड डिलिव्हरीसाठी (food delivery) येत त्यांच्याशी तिचे अनेकदा खटके उडाल्याचे काही जणांनी सांगितले आहे.
तर फूड डिलिव्हरी करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याशी ती वाद घालत असे, तसेच त्यांच्याकडून ऑर्डर (Order) घेऊन अनेकदा पैसे न देताच त्यांना परत पाठवल्याचा दावाही सोसायटीतील लोकांनी (people in society) केला आहे.
तसेच केतकी राहत असलेल्या रोडपाली परिसरातील सोसायटीतील रहिवाश्यांनी काही धक्कादायक गोष्टींचा दावा केला आहे. केतकीचं वागणं सोसायटीतील लोकांशी व इतरांशीही ठीक नसल्याचे तिच्या सोसायटीतील लोकांनी सांगितलं आहे.
ती शेजाऱ्यापाजाऱ्यांशी जास्त बोलत नाही. सोसायटीच्या निर्णयांनाही केतकीने अनेकदा विरोध केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ज्या मिटिंगमध्ये ती नसते त्या मिटिंगमधील निर्णयाला तर तिचा विरोध ठरलेलाच असतो अशी तक्रारही त्यांनी केली आहे.