Netflix : जर तुम्हीही नेटफ्लिक्स वापरत असाल तर तुमच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आहे. कारण नेटफ्लिक्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम थेट वापरकर्त्यांच्या खिशावर होणार आहे.
महागाईत त्यांना आणखी एक झळ बसली आहे. नेटफ्लिक्सचा पासवर्ड आता दुसऱ्या व्यक्तीला शेअर करता येणार नाही. त्यामुळे आता प्रत्येकाला वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत.
नेटफ्लिक्स आता यावर्षी म्हणजे 2023 च्या पहिल्या तिमाहीत भारतात पासवर्ड शेअरिंगशी निगडीत नवीन नियम लागू करणार आहे. त्यामुळे आता Netflix पासवर्ड शेअर करण्याचा पर्याय नसणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक नवीन लॉगिनसाठी स्वतंत्रपणे पैसे मोजावे लागणार आहेत.
केली ही घोषणा
दरम्यान,नेटफ्लिक्सने आपल्या कमाईच्या अहवालादरम्यान असे सांगितले की 2023 च्या पहिल्या तिमाहीत त्याची पेड-शेअरिंग सेवा अधिक वापरकर्त्यांसाठी सुरू केली जाणार आहे. “आमच्या अटी आणि शर्ती सांगतात की नेटफ्लिक्स खाती फक्त एका घरामध्ये वापरली जावीत, तरीही अनेक सदस्य इतरांसोबत खाती शेअर करत आहेत.”
खात्यावर मिळणार नियंत्रण
नेटफ्लिक्सने म्हटले आहे की लवकरच आता वापरकर्त्यांना नेटफ्लिक्सचा चांगला अनुभव मिळेल आणि त्यांच्या खात्यावर चांगले नियंत्रण मिळेल. Netflix वापरकर्ते सदस्यांचे पुनरावलोकन करू शकतील तसेच त्यांचे खाते कोणत्या डिव्हाइसवर वापरले जात आहे ते समजणार आहे. वापरकर्ते त्यांचे प्रोफाईल नवीन खात्यात हस्तांतरित करण्यास सक्षम असणार आहेत. जेणेकरून ते शिफारस केलेले शो पाहणे सुरू ठेवू शकतील.
गेल्यावर्षी केले बदल
Netflix ने गेल्या वर्षी आपले नवीन पासवर्ड शेअरिंग धोरण लागू केले होते, ज्यामध्ये सदस्य खाते शेअरिंगसाठी दरमहा अतिरिक्त $2.99 भरतात. 2022 हे वर्ष कंपनीसाठी चांगले नव्हते आणि त्यांचे ग्राहक गेल्यावर्षी खूप कमी झाले. नेटफ्लिक्सलाही शेकडो कर्मचाऱ्यांना खर्चात कपात करावी लागली.