ताज्या बातम्या

लोकांना फसविण्यासाठी सायबर चोरट्यांकडून वापरले जातायत नवनवीन फंडे

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- करोना काळात अनेकांचे व्यावसाय बंद पडले, नोकऱ्या गेल्या. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पैशांची गरज असल्याने लोक बँकेतून काही लोन मिळते का? यासाठी पाठपुरावा करतात.

मात्र बँकेतून सहज लोन उपलब्ध होत नाही. लोकांच्या आर्थिक अडचणींचा फायदा सायबर चोरटे घेत आहे. लोन देऊन ते वसूल करण्याची नवी पध्दत या चोरट्यांनी आणली आहे.

अशी फसवणूक करणारे सर्व चोरटे महाराष्ट्र बाहेरचे आहेत.. आपणास लोनची ऑफर आहे, दोन ते तीन वर्षांमध्ये परतफेड करू शकता, कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

असे सांगून लोकांना लोन घेण्यास भाग पाडले जाते. अशी होते फसवणूक संबंधितास प्ले स्टोअरवरून फ्री अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.

फ्री लोन अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जाते. आपणास लोन मंजुर करून ते खात्यावर पाठविले जाते.

काही दिवस गेल्यानंतर आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आपली बदनामी केली जाते. मोबाईल नंबर, फोटोचा गैरवापर करून नातेवाईक, मित्रपरिवारांना फोन, मेसेज करून आपण कसे बदनाम आहोत, हे सांगितले जाते. बदनामी टाळण्यासाठी लोन मंजुर केलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैशांची मागणी केली जाते.

पैसे दिले नाही तर बदनामीची भिती दाखविली जाते. लोक बदनामीच्या भितीने पैसे भरतात तर काही जण सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी येतात. अलिकडच्या काळात अशा तक्रार येऊन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

असे काही घडल्यास संबंधितांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts