छत्रपती शिवरायांच्या ‘गनिमी काव्या’ने नवं सरकार; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

नागपूर : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार संभाळत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या गनिमी काव्याप्रमाणे निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आले. सरकार बनवीन, पण सरकारमध्ये जाणार नाही, अशी घोषणा मी केली होती. घोषणा करुन मी घरी गेलो, तर आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी अनाऊन्स करुन टाकलं की देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये जावं, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

जेपी नड्डा, अमित शाह, नरेंद्र मोदी हे सगळे माझ्याशी बोलले. आपल्या पक्षात आदेश हाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी एकच निर्णय केला, की नरेंद्र मोदी आणि भाजप माझ्या पाठीशी नसते तर आपला नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

 जे नेते आणि पक्ष आपल्याला सर्वोच्च पदावर नेतात, त्यांनी आदेश दिला, तर मी घरी बसायलाही तयार आहे, पण त्यांनी तर माझा सन्मान केला आहे. मोदी-शाह म्हणाले की, १०६ जणांचे नेतृत्व तू करतोयस, जबाबदारी घे आणि सरकारमध्ये जा, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts